आमच्या फिटनेस सेंटरमध्ये, तज्ञांच्या देखरेखीखाली नियमित आणि सातत्यपूर्ण व्यायाम करून विद्यार्थी निरोगी जीवनासाठी तयार होतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
किशोरवयातील मुलामुलींना एकट्याने, स्वतंत्रपणे काही उपक्रम करून पहायचे असतात. त्यांना आपल्या मनातील भविष्यविषयक कल्पनांचा वेध घेत पुढे पुढे जायचे असते. ARISE MULTIFITNESS मध्ये आमचा ‘फिटनेस इन टीन्स प्रोग्राम’ अशाच विविध उपक्रमांची रेलचेल असलेला आहे. यामध्ये किशोर मुलामुलींना शारीरिक फिटनेस, मानसिक फिटनेस, भावनिक फिटनेस आणि सामाजिक फिटनेसचे भान देत यासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. इयत्ता ५ वी ते १० वी च्या वर्गात शिकत असलेल्या मुलामुलींना शारीरिक फिटनेससाठी आवश्यक असलेली विविध उपकरणे, उपक्रम आणि खेळ यामधून तज्ञ प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षणप्रणालीद्वारे सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात दररोज एक तास मूल्ये, कौशल्ये, क्षमता आणि शिस्त शिकवतात.